Breaking News

‘लायन्स’तर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझर

पनवेल : रामप्रहर वृत्त – लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट नवी मुंबईच्यावतीने ऑक्टोबरमधील पहील्या आठवड्यात विविध उपक्रम राबविले जातात. 2 ऑक्टोबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ’करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस’ येथे आपलं घर समजून राहणारे वृद्ध यांना तसेच कोविडच्या काळात जिवाची बाजी लावणारे पोलीस कर्मचारी यांच्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.

या वेळी लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा लायन संगीता जोशी, स्नेहकुंज आधारगृहाचे संचालक लायन नितीन जोशी, यशकल्प फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त लायन यशवंत बिडये, केवाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक लायन लहू तातरे आदी लायन्स क्लबच्या वतीने उपस्थित होते.

या वेळी करुणेश्वर ओल्ड एज केअर मध्ये संचालक ईश्वर ढोरे, करुणा ढोरे तसेच पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस एपीआय नितीन बडगुजर यांच्या मार्गदर्शनाने हवालदार के. एच. पाटील पोलीस हवालदार आर. पी. म्हात्रे आदी मंडळी उपस्थित होती. कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेण्यात आली.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply