Breaking News

कोरोना काळात सलग 100 दिवस धावण्याचा पराक्रम

खारघर : प्रतिनिधी – कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपल्या चांगल्या स्वास्थासाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा परिस्थिती कोरोनाच्या काळात सलग 100 दिवस धावून महाड आद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी बाळासाहेब झंजे यांनी अनोखे विक्रम आपल्या नावावर केले आहे. कार्यालयीन कामकाज सांभाळून दररोज 7 ते 10 किमीचे अंतर गाठत असत 27 जून ते 4 ऑक्टोबर दरम्यान झंजे यांनी आपला 100 दिवस धावण्याचा विक्रम पूर्ण केला.

नवीन पनवेलमधील गुड मॉर्निंग रनर ग्रुपचे सदस्य आपल्या चांगल्या स्वास्थासाठी दररोज व्यायाम, योगा करत असतात. त्यातूनच झंजे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी सलग 100 दिवस सलग धावण्याचा संकल्प केला. या संकल्पात ग्रुपचे सदस्य व पोलीस दलातील सेवेत असलेले चांगदेव भोसले, रवी कुमार, जयेश टेंबे हे देखील सहभागी झाले. या संकल्पादरम्यान सर्वांनी आपले ध्येय साध्य करत असताना विविध पर्यटन ठिकाणे, गड किल्ले आदींना भेट दिली. यामध्ये आंबेनळी घाट, मोरबे धरण, प्रतापगड, रायगड आदींसह रायगड पनवेल परिसरातील पर्यटन ठिकाणांचा समावेश आहे. रविवारी पनवेलमधील पुष्पक नगर याठिकाणी सुमारे 21 किमीचे अंतर गाठत आपला 100 दिवसांचा संकल्प पूर्ण केला. या 100 दिवसांच्या कार्यकाळात सुमारे 750 किमी पेक्षा जास्त अंतर बाळासाहेब झांजे व त्यांच्या साथीदारांनी गाठला. मागील वर्षी देखील अशाच प्रकारचा संकल्प गुड मॉर्निंग रनर ग्रुपच्या या सदस्यांनी पूर्ण केला होता.

शासकीय कामात कोणतेही व्यत्यय न आणता मी व माझ्या साथीदारांनी आम्ही स्वतः ठरविलेला संकल्प पूर्ण केला. चांगले आरोग्य, क्षारिरिक स्वास्थ राखण्यासाठी प्रत्येकाने अशाप्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास प्रत्येक जण सुदृढ बनेल.कोरोना सारख्या संकटात देखील आपल्याला आपले स्वास्थ निरोगी राखता येईल. याकरिता प्रत्येकानी अशाप्रकारे संकल्प स्वीकारणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब झांजे यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply