Breaking News

नवी मुंबईत भाजपचे चक्का जाम आंदोलन

मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासह त्वरित अटक करण्याची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणात  ठाकरे सरकारमधील वन मंत्री संजय राठोड हे दोषी असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांना त्वरित अटक करा, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या या मागणीसाठी आमदार श्वेता महाले, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सायन-पनवेल महामार्गावर चक्का जाम करित तीव्र आंदोलन केले. संपूर्ण राज्यभर असे आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात आले. नवी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते व पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

महाविकास आघाडीतील ठाकरे सरकार पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करीत असल्याचा गंभीर आरोप करत बुलढाण्याच्या आमदार श्वेता महाले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे सरकार हाय हाय, आघाडी सरकार मुर्दाबाद आघाडी सरकारचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा देत तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले .

या वेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत म्हणाले की, वनमंत्री संजय राठोड यांना ठाकरे सरकार पाठीशी घालत आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तपास योग्यप्रकारे होत नाही, राज्यातील सामान्य जनता चिडलेली आहे, त्यांच्यामध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे. चक्काजाम आंदोलनामध्ये नवी मुंबईतील सामान्य नागरिकांसह भाजपचे कार्यकर्ते उतरले असून राठोड यांना त्वरित अटक करावी, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अन्यथा मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत आंदोलन उभारू, असा डॉ. घरत यांनी दिला.

चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र  घरत, महिला मोर्चा अध्यक्षा  दुर्गा ढोख, माजी अध्यक्षा वर्षा भोसले, प्रदेश सदस्य कल्पना  शिंदे, महामंत्री कल्पना छत्रे, माजी नगरसेविका विजया घरत, जिल्हा उपाध्यक्ष राजाराम पाटील, मंडळ अध्यक्ष सुरेश अहिवले,  नारायण पाटील, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, युवा उपाध्यक्ष अविनाश भगत आदींसह शेकडो कार्यकर्ते सायन-पनवेल महामार्गावर उतरत निषेदाच्या घोषणा देत चक्का जाम केले.

या वेळी महिला भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटपट झाली. आंदोलनादरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत व कार्यकर्ते यांना अटक केली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply