Breaking News

वावेपोटगे गावात स्वच्छता अभियान

रोहे ः प्रतिनिधी

रोहा अलिबाग मार्गावर असलेले वावे पोटगे येथे कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोली येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास कृषी कार्यानुभव कार्यक्र्रमांतर्गत वावेपोटगे (ता. रोहा) गावातील मंदिर परिसरात श्री काळकाई देवी मित्र मंडळाच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविले. या वेळी श्रमदान करून त्यांनी श्री काळकाई देवी व राजूबाई देवी मंदिर पारिसर स्वच्छ केला. तेथील कचरा गोळा करून तो नष्ट केला. या वेळी त्यांनी मंदिराजवळील झाडांना भर घातली. या अभियानात कृषीभूषण गटाचे सदस्य गणेश चव्हाण, कुणाल जाधव, तृप्तेश गावडे, अभिनव वैज, ओंकार खानविलकर, पुरुषोत्तम गारे, मंडळाचे सदस्य मुकेश गिजे, अक्षय ठाकूर, ऋतिक म्हात्रे, अंकेश मोरे, जयेश सालस्कर यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह भाग घेतला होता.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply