पनवेल : वार्ताहर
भाजपा बेस्ट कामगार संघाची बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याबरोबर करारा संदर्भात बोलणी झाली आहे.कुलाबा येथे सुरेंद्रकुमार बागडे यांच्यासोबत बेस्ट कर्मचार्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली.
या चर्चेमध्ये बेस्ट कामगारांचे मागील सोळा महिन्यांपासून ड्युटी शेड्युल जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर चालू करावे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून ड्युटी शेड्युल चार माही सुरू करण्याचे आश्वासन दिले. लॉकडाऊन काळातील कामगारांवर गैरहजेरी बाबत जी कारवाई करण्यात आली ती मागे घ्यावी व कामगारांना कोणतेही आरोप पत्र देऊ नये, अशी मागणी केली. जाहीर केलेला कोविड भत्ता 300 रुपये देण्यात यावा. सन 2016 ते 2021 च्या कराराची बोलणी लवकर सुरू करावी अशी मागणी केली. व त्यास महाव्यवस्थापक यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तसेच पुढील आठवड्यापासून करारावर सविस्तर चर्चा होणार आहे.
बेस्ट उपक्रमाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेत लवकरात लवकर विलीनीकरण करावे, अशीही मागणी करण्यात आली व यावर चर्चाही झाली. तसेच बेस्ट कामगारांचे अनेक प्रलंबित प्रश्न व कामगारांची प्रमोशन पॉलिसी यावरही चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी चांगल्या वातावरणात बैठक पार पडली. या बैठकीस महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, अतिरिक्त महाव्यवस्थापक मदने, सांगळे व शेट्टी तसेच भाजप बेस्ट कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके, कार्याध्यक्ष प्रकाश वाळके, सरचिटणीस गजानन नागे, उपाध्यक्ष आनंदा जरग बबन बारगजे चिटणीस राजकुमार घार्गे, राजू लिहिणार, प्रशांत कदम व व भाजप बेस्ट कामगार संघाचे अन्य पदाधिकारी हजर होते.