Breaking News

पोलादपुरात दोन ठिकाणी दरडींनी केला घात; केवनाळे, सुतारवाडीत 11 जणांचा मृत्यू

पोलादपूर ः प्रतिनिधी

महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी येथेही अशाच प्रकारे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोवेले ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे गुरुवारी (दि. 22) रात्री 10च्या सुमारास भूस्खलन झाले. कोसळलेल्या दरडीखाली सुमारे आठ ते 10 घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडीसोबत उतारावर वाहून गेली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर केवनाळे येथून सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. याशिवाय सुतारवाडी येथील 10, केवनाळे येथील दोन आणि कुंभार्डे येथील एक अशा 13 जखमींना बाहेर काढण्यात आले असून या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल अर्धा मधोमध तुटून वाहून गेला. याखेरीज साखर बोरज येथील पुलदेखील तुटून वाहून गेल्याने गोवेले गावाकडे कोणत्याही प्रकारचे मदतकार्य पोहोचविणे प्रशासनास शक्य झाले नव्हते, मात्र स्थानिकांच्या मदतीने शुक्रवारी सकाळी बचावकार्याला सुरुवात झाली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply