पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 8) नव्या 338 रुग्णांची आणि 14 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 452 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 225 व ग्रामीण 38) तालुक्यातील 263, अलिबाग 19, उरण 16, पेण 10, कर्जत व खालापूर प्रत्येकी सात, महाड पाच, रोहा चार, मुरूड व माणगाव प्रत्येकी तीन आणि सुधागड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल (मनपा नऊ, ग्रामीण एक) तालुक्यात 10, महाड दोन आणि कर्जत व अलिबाग तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 49,637 आणि मृतांची संख्या 1409 झाली आहे. जिल्ह्यात 44,759 जण कोरोनामुक्त झाल्याने 3469 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …