Breaking News

पनवेलमध्ये 263 नवे पॉझिटिव्ह

10 जणांचा मृत्यू; 277 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 8) कोरोनाचे 263 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 277 जण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 209 रुग्ण बरे झाले असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 38 रुग्ण आढळले तर 68 रुग्ण बरे झाले आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल रचना रेसिडेन्सी, आपटे वाडा, खांदा कॉलनी  सेक्टर 6, नीळकंठ दर्शन, नवीन पनवेल सेक्टर 10 विठोबा सोसायटी, कामोठे सेक्टर 17  शीतलधारा कॉम्प्लेक्स, खारघर सेक्टर 12  गुरुवाटिका सोसायटी , सेक्टर 35 जी हाईड पार्क, सेक्टर 34 सी ओवल अपार्टमेंट, आणि सेक्टर 19 रोयल प्लाझा येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 14 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3308 झाली आहे. कामोठेमध्ये 102 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4727 झाली आहे. खारघरमध्ये 70 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 4684 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 23 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 3853 झाली आहे. पनवेलमध्ये 15 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3572 झाली आहे. तळोजामध्ये एक नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 807 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 20951 रुग्ण झाले असून 18680 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.16   टक्के आहे. 1782 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 489 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात कोरोनाचे 16 नवे रुग्ण

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात गुरुवारी (दि. 8) कोरोनाचे 16 नवे रुग्ण आढळले असून 20 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये म्हात्रेवाडी करंजा रोड चार, कोटनाका तीन, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट कामठा, भवरा, बोकडविरा, जेएनपीटी टाऊनशिप, विंधणे, कामठा, साईकिरण आनंद नगर उरण, गॅलक्सी अपार्टमेंट मोरा, स्टार कॉम्प्लेक्स म्हातवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये नयन अपार्टमेंट बाजारपेठ तीन, दिघोडे दोन, उरण दोन, कामठा विघ्नहर्ता दोन, पिरकोन दोन, फुंडे दोन, देऊळपाडा खोपटे, समाज मंदिराजवळ डाऊरनगर, साईबाबा मंदिराजवळ डोंगरी, नागाव, बोरी उरण, पाणदिवे, वारीक आळी नागाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1943 झाली आहे. त्यातील 1718 रुग्ण बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 126 कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 99 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply