‘डाऊ केमिकल्स’च्या कामगारांनी स्वीकारले जय भारतीय जनरक कामगार संघटनेचे सदस्यत्व
पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत या युनिटच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी बोलताना त्यांनी आम्ही सर्व कामगारांच्या पाठीशी असून, त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.
नामफलक अनावरण सोहळ्यास भाजप नेते संजय पाटील, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवी नाईक, कार्यसचिव समिरा चव्हाण, सरचिटणीस मोतिराम कोळी, प्रवीण भोईर, नितीन पाटील, खजिनदार प्रकाश गडगे, नारायण म्हात्रे, अविनाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, तसेच रविकांत म्हात्रे, संघटनेचे युनिट अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, चिटणीस सुरेश पाटील, सरचिटणीस प्रवीण भोईर यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.