Breaking News

राज्य सरकारच्या विरोधात आज आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अत्याचाराबाबत राज्य सरकार निष्क्रिय व उदासिन आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सुचनेनूसार सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे वाढते प्रमाण पाहता राज्यातील सरकार अत्याचार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलांची सुरक्षितता किती महत्वाची आहे याचे गांभीर्य या तीन चाकी महाविकास आघाडी सरकारला नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या निष्क्रीय सरकार विरोधात संपूर्ण राज्य भर सोमवारी आणि मंगळवारी आंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पनवेलमध्येही आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

हे आंदोलन पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10.30 वाजता उत्तर रायगड जिल्हाअध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील व उत्तर रायगड संघटन महामंत्री अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार आहे. या आनंदोलनास मंडल अध्यक्षांनी दहा पदाधिकार्‍यांना घेऊन सहभागी होण्याचे आवाहन उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दर्शना भोईरच मृणाल खेडकर यांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply