Breaking News

कर्नाटकने जिंकला सय्यद मुश्ताक अली चषक

इंदूर : वृत्तसंस्था

मयांक अगरवालची तुफानी फटकेबाजी आणि रोहन कदमच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला आठ गडी व नऊ चेंडू राखून धूळ चारत विजेतेपदाला गवसणी घातली. या पराभवामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

नौशाद शेख (नाबाद 69) आणि कर्णधार राहुल त्रिपाठी (30) यांच्या योगदानामुळे महाराष्ट्राने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 155 अशी धावसंख्या उभारली होती. अभिमन्यू मिथुनने दोन; तर केसी करिअप्पा व जगदीश सुचित यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत महाराष्ट्राला रोखले. कर्नाटकने विजयी लक्ष्य 18.3 षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले.

Check Also

कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कबड्डी राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, …

Leave a Reply