Breaking News

बर्निंग कारचा थरार

उरण : वार्ताहर

उरण शहरातील कोटनाका येथील क्सिस बँकेच्या समोर पार्कींग करुन ठेवण्यात आलेली शिफ्ट डिझायर या चारचाकी गाडीला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. भर बाजारपेठेतील वर्दळीच्या रस्त्यावरच अचानक पेटलेल्या गाडीमुळे रस्त्यावरील पादचार्‍यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.आगीमुळे दुचाकींना धोका पोहचण्यापुर्वीच अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानाने तत्काळ आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सफेद रंगाची स्वीफ्ट डिझायर टुरिस्ट गाडी मुंबईतील चुनाभट्टी येथील असुन भाडे घेऊन उरण येथे आली होती. प्रवाशाला उतरविल्यानंतर ड्रायव्हरने गाडी पार्क करून चहा पाणी पिण्यासाठी गाडी बाहेर आला होता. त्यामुळे त्याला काही एक इजा झाली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply