पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, मंगळवारी (दि. 13) नव्या 212 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 316 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 126 व ग्रामीण 29) तालुक्यातील 155, अलिबाग 19, उरण व कर्जत प्रत्येकी आठ, पेण सात, महाड सहा, रोहा चार, माणगाव तीन आणि कर्जत व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण अलिबाग तालुक्यात दोन आणि पनवेल, कर्जत व रोहा तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 50,952 आणि मृतांची संख्या 1442 झाली आहे. जिल्ह्यात 46,603 जण कोरोनामुक्त झाल्याने 2907 विद्यमान रुग्ण आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper