Breaking News

पोलादपुरात भाजप कार्यालयाचे उद्घाटन

आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील भुमिपुत्र आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवशी पोलादपूर शहर भाजप कार्यालयाचे उदघाटन आनंदनगर येथे करण्यात आले.

शहर भाजपचे उपाध्यक्ष सचिन बुटाला यांच्या निवासस्थानी आनंदनगर येथील माजी सैनिक हनुमंतराव येरूणकर यांच्याहस्ते फित कापून या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. याखेरिज, पोलादपूर तालुक्यातील पैठण, देवपूर, भोगाव, गांजवणे आणि कोंढवी येथील आदिवासीवाडयांमधील आदिवासी बंधूभगिनींना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई आणि कपडेवाटप करण्यात आले.

या वेळी उपाध्यक्ष मनोज भागवत, महिला अध्यक्ष उज्वला मराठे शेठ, नितीन घोसाळकर, महेश निकम, एकनाथ कासूर्डे, जयेश जगताप, समाधान शेठ, शहर उपाध्यक्ष सचिन बुटाला, अमित तलाठी, निलेश चिकणे, गणेश पाटणकर, भाई जगताप, पद्माकर मोरे, नवनाथ कासुर्डे, मनोज मोरे, परेश साबळे, राजेश कदम, पंकज बुटाला, नामदेव शिंदे, अर्चना शेठ, रश्मी दीक्षित, माई शिंदे, जान्हवी तलाठी, सपना बुटाला आदी भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, देवपूर येथील पुणे स्थित उद्योजक अरविंद चव्हाण, भाजप नेते राजू धुमाळ, राजेश कदम, विभाग अध्यक्ष परेश महाडिक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply