धाटाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधित दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून रोहा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व डॉक्टरांसह तेथील कर्मचार्यांना फळांचे वाटप करण्यात आले.
तसेच रोहा तालुक्यात पाले (बुद्रुक) आदिवासी वाडी येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय कोणकर, रोहा तालुका युवा मोर्चा अमरदीप म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य राजेश डाके, विलास डाके, निलेश धुमाळ, युवती प्रमुख धनवी मॅडम यांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.