Breaking News

खोपोली एक्झिटजवळ कारचा भीषण अपघात

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खोपोली एक्झिटजवळ ट्रकने हुलकावणी दिल्याने कार रस्त्याच्या सुरक्षा कठड्यावरून खाली खड्ड्यात पडली. सुदैवाने ती दगडांमध्ये अडकली अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता. बुधवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये कारमधील तीन जण सुदैवाने बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाची कार (क्र. चक 02 एन 3887) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून खोपोली एक्झिट येथे बाहेर पडली व बायपास रस्त्याने खोपोली गावाकडे जात असताना द्रुतगती मार्गाच्या पुलाजवळ एका वेगवान ट्रकने दोन वाहनांना धडक दिली. यामध्ये कार ही रस्त्याच्या सुरक्षा कठड्यावरून खाली खड्ड्यात पडली व दगडात आडकली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी आतमधील तीनही जण सुरक्षित आहेत.

घटनेची माहिती समजताच खोपोली व बोरघाट पोलिसांसह अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढत त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. क्रेनच्या सहाय्याने खड्ड्यात पडलेली कार बाहेर काढली. या अपघाताचा पुढील तपास खोपोली पोलीस करत आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply