पेण : प्रतिनिधी
मुंबई- गोवा महामार्गावरील जिते (ता. पेण) गावच्या हद्दीत एका ट्रकने रिक्षेला पाठिमागून ठोकर दिली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षेमधील प्रवासी जखमी झाले.
फिर्यादी (रा. बारपाडा, ता. पनवेल) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षे (एमएच-46, बीडी-7296) मध्ये मंगळवारी (दि. 13) रात्री प्रवाशी घेवून मुंबई -गोवा महामार्गाने पेण येथे जात होते. जिते गावाच्या उड्डाणपुलावर त्यांच्या रिक्षेला पाठीमागून येणार्या ट्रक (एमएच-46, एएफ-5985) ने ठोकर दिली. या अपघातात रिक्षेमधील प्रवासी लहू बारक्या वाघमारे (वय 35), गिरीजा लहू वाघमारे (वय 30) आणि सोनाक्षी लहू वाघमारे (वय 04, सर्व रा. लाडवली आदिवासी वाडी, ता. पनवेल) हे प्रवासी जखमी झाले असून, रिक्षेचेही नुकसान झाले आहे. जखमींना पेणयेथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार एस. जी. पाटील करीत आहेत.