Breaking News

माणगाव दाखणे गावात वटपौर्णिमेनिमित्त वृक्षवाटप

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील दाखणे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वास उभारे यांनी मंगळवारी (दि.14) सकाळी वटपौर्णिमेचे औचित्य साधून ग्रा.पं.च्या वतीने एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम हाती घेत खर्डी गावातील जवळपास 80 महिलांना वडाच्या वृक्षाचे वाटप केले. माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभे यांच्या हस्ते व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, दाखणे सरपंच विश्वास उभारे, विस्तार अधिकारी अशोक मार्कड, ग्रा.पं. सदस्य संजना करकरे, माजी उपसरपंच राजू शेडगे, ग्रामसेवक सदानंद राजिवडे, सामाजिक कार्यकर्ते संजय करकरे यांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात येऊन या मान्यवरांच्या उपस्थितीत या वृक्षांची लागवडही यावेळी करण्यात आली.  माणगाव पं. स.चे गटविकास अधिकारी प्रभे यांनी सांगितले की, हा अत्यंत चांगला व कौतुकास्पद कार्यक्रम आहे. वटवृक्षामुळे सावली तर मिळतेच पण 24 तास हा वृक्ष ऑक्सिजन देत असतो.सरपंच विश्वास उभारे यांनी ग्रामस्थांना झाडे लावा,झाडे जगवाचा चांगला संदेश दिला आहे. सूत्रसंचालन ग्रामसेवक सदानंद राजिवडे यांनी केले.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply