कोरोनामुळे नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने
पनवेल : रामप्रहर वृत्त
आदिशक्ती, आदिमाया यांसारख्या विविध रूपांनी व नावांनी ओळखल्या जाणार्या देवीच्या नवरात्रोत्सवाला शनिवार (दि. 17)पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने सार्वजनिक स्वरूपात देवीची प्रतिष्ठापना होणार असून, घरगुती घटही बसतील. त्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत.
गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाची उत्सुकता आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. कोरोनामुळे उद्भवलेली संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण नियम पाळून साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे. याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. त्याला अनुसरून मंडळांनी तयारी केली आहे.