गव्हाण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनि. कॉलेज गव्हाण येथे आज शनिवारी (दि.30) संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची सहचारिणी रयतेच्या विद्यार्थ्यांची रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सांस्कृतिक मंडळाने हा कार्यक्रम साजरा करण्याची संधी’ सातवी अ ’ या वर्गाकडे सोपविली होती. या वर्गातील विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेची उभारणी व त्यासाठी भाऊरावांना रयत माउलीने दिलेले योगदान या बाबतची माहिती आपल्या सूत्रसंचालनातून व भाषणातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली. यामध्ये मंगल घरत ,कु. सिद्धी कोळी यांचा सहभाग होता.
विद्यालयाच्या उपशिक्षिका डी .आर. वर्तक यांनी रयत माऊलीचा जन्म ,त्यांचे भाऊरावांबरोबर झालेले लग्न ,जैन समाजातील असून ही वहिनींनी वसतिगृहातील मुलांची आई प्रमाणे घेतलेली काळजी ,त्यासाठी आपल्या सौभाग्य अलंकाराचेही दिलेले दान व अण्णांना दिलेली मोलाची साथ आपल्या ओघवत्या भाषणातुन विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
प्राचार्या डोईफोडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना संस्थेचे विद्यार्थी म्हणून अभ्यास करून मोठे व्हावे नावलौकिक मिळवावा व रयत माउलीचे योगदान सत्कारणी लावावे असे मार्गदर्शन केले. कर्मवीर आण्णा व रयत माऊलीच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या डोईफोडे मॅडम यांनी उपमुख्याध्यापक शेख सर, पर्यवेक्षक घाग सर व सर्व शिक्षक वर्गाने केले. या नंतर अटल टिंकरिंग लॅब मधून नॅशनल रोबॅटिक चॅम्पियनशिप 2019 साठी आय.आय.टी. पवई साठी निवड झालेल्या 15 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली साठी विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ भगत,स्कुल कमिटी सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी ,अटल टिंकरींग लॅब प्रमुख व गुरुकुल प्रमुख आर. एस. भोईर, प्राचार्या डोईफोडे, शेख सर, घाग सर व सर्व शक्षक वर्ग यांन कडून शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना या प्रसंगी विद्यालयाचे ग्रंथपाल व शिक्षकेतर कर्मचार्यांनी स्वतः बनवलेल्या गोड खाऊचे वाटप करण्यात आले.