Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून कळंबोलीतील कामांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून होणार्‍या विविध कामांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) गुरुवारी पाहणी केली. ही कामे वेळेत पूर्ण करा, असे आमदार ठाकूर यांनी या वेळी अधिकार्‍यांना सूचित केले. कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोकडून केली जात असलेली कामे ही अत्यंत संथ गतीने सुरू असून, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. ही बाब सिडको अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्यासाठी या पाहणी दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या पाहणी दौर्‍यात नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चाचे गोविंद झा, अमर ठाकूर, भाजप नेते अशोक मोटे, प्रकाश शेलार, शितेंद्र शर्मा, प्रकाश महानवर, जमीर शेख, अजहर शेख, केशव यादव, दिलीप बिस्ट, विलास शिते, मच्छींद्र कुरूंद, कविता गुजर, सिडकोचे अधिकारी श्री. रोकडे, श्री. बनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकार्‍यांसमवेत रस्ते, गटारे तसेच स्मशानभूमीची पाहणी केली. आराखड्यानुसार काम करीत असताना ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तसेच ज्या परिसरात पाणी साचत आहे ती कामे दिवाळीपूर्वी कामे झाली पाहिजेत, अशी सूचना आमदार ठाकूर यांनी अधिकार्‍यांना केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply