Breaking News

खडसेंच्या प्रवेशावरून आघाडीतील आमदार नाराज

मुंबई : प्रतिनिधी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी (दि. 23) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, मात्र महाविकास आघाडीसाठी हा निर्णय भविष्यात संघर्षाचा ठरू शकेल अशी चिन्ह दिसत आहेत. खडसेंच्या प्रवेशावेळी विश्वासात न घेतल्याने मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील नाराज झाले आहेत. आमदार पाटील हे मुक्ताईनगर येथून एकनाथ खडसे यांच्या मुलीला हरवून विजयी झाले आहेत. ते म्हणाले, खडसेंनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. आमच्या तोंडी फेस आणला. आमच्यावर अन्याय केला आणि आता तेच पक्षाकडून अन्याय झाल्याची भाषा करीत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर खडसेंनी खोटे गुन्हे नोंदवले आहेत. त्यामुळे कटूता लगेच संपेल असे वाटत नाही. त्यांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे असे सांगून, जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले चालले आहे. ते आता खडसे आल्यामुळे व्यवस्थित चालेल असे वाटत नाही, अशी भीतीही आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply