Breaking News

उरण येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन

उरण : वार्ताहर

उरण नगर परिषद हद्दीतील श्री सिद्धिविनायक सोसायटी रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथील नागरिकांनी या रस्त्यामुळे होणारा त्रास नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांना सांगितला. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक सोसायटीमधील रस्त्याचे काँक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 5) नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते व नागरिकांच्या उपस्थित करण्यात आले. या वेळी वसंत म्हात्रे, संजय चिपळूणकर, विकास कडू, स्नेहा चिपळूणकर, कांचन कडू, अशोक पाटील, रोहित पाटील, चंद्रकांत वैवडे, राजेंद्र हाबडे, अमिरूळ शेख, रोहिणी वैवडे, परशुराम एरंडे, वासंती म्हात्रे, सरीता कजबजे, सुर्यकांत दर्णे, प्रवीण पाटील, प्रगती एरंडे, प्रमोद म्हात्रे, हेमंत म्हात्रे, लालमनी यादव, निखील गुरव, प्रियंका म्हात्रे आदी उपस्थित होते. उरणमध्ये आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे होत आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply