जि.प. शाळेची नवीन इमारत बांधण्याची मागणी
उरण : वार्ताहर – नवघर जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत सुमारे 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सहा वर्षांपूर्वी शाळेची कौलारू जुनी, जीर्ण झालेली इमारत धोकादायक झाली आहे. नवघर जिल्हापरिषद शाळेची दुरवस्था झालेली असल्याने शाळेची नवीन इमारत बांधण्याकरिता नवघर ग्रामस्थ तयार असताना नवघर ग्रामपंचायत परवानगी नाकारत आहेत. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.22) नवघर ग्रामपंचायतविरोधात नवघर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
या उपोषणास ग्रामस्थ सुधीर घरत, योगेश तांडेल, मनोहर धनाजी भोईर, जयप्रकाश पाटील, राजेश कडु, प्रतीक घरत, अमित जोशी, राजेश पाटील, ज्ञानेश्वर भोईर, समाधान तांडेल, गांधार पाटील, सुरेश तांडेल, मनीषा मनोहर पाटील, नवघर ग्रामपंचायत सदस्या मयुरी जयप्रकाश पाटील, भागाबाई मधुकर भोईर, नवघर ग्रामपंचायत सदस्या दमयंती अशोक पाटील, वैभव भोईर, एल. बी. पाटील, नवेल तांडेल, किशोर कडू, कुंदन कडु, जयप्रकाश भोईर, धर्मेंद्र तांडेल, विश्वास तांडेल, भरत भोईर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
नवघर जिल्हापरिषद शाळेची दुरवस्था झालेली असल्याने शाळेची नवीन इमारत बांधण्याकरिता नवघर ग्रामस्थ तयार असताना नवघर ग्रामपंचायत परवानगी नाकारत आहेत. त्यामुळे आम्ही एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करीत आहोत, असे ग्रामस्थ सुधीर घरत यांनी सांगितले.