Breaking News

कर्नाळातील ‘त्या’ वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत

पनवेल : रामप्रहर वृत्त

कर्नाळा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले नाही म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन आदिवासी वाड्यांतील पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र याबाबत प्रसारमाध्यमे आणि ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठविल्याने या वाड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

कर्नाळा ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली असून या निवडणुकीत शेकापक्षाला भाजप-शिवसेनाप युतीच्या उमेदवारांनी जोरदार टक्कर देत शेकापला आव्हान निर्माण केले होते. यामुळे शेकापक्षाला काही ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. याचा राग मनात धरून आखाडावाडी आणि लहुचीवाडी या आदिवासी वाड्यांतील पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्याचा त्रास महिलांना मोठ्या प्रमाणात झाला.

शेकाप कार्यकर्त्यांनीही मतदान कमी झाले तर पाणीपुरवठा तोडू अशी धमकीच या वाडीतील मतदारांना दिली होती. याबाबतचे वृत्त विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. शिवाय ग्रामस्थांनीही याबाबत जोरदार आवाज उठविला. यामुळे खजिल झालेल्या शेकापने या वाड्यांतील पाणीपुरवठा पूर्ववत केला.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply