Breaking News

घराघरातून लाकडी देवघर होतंय नामशेष

उरण : दिनेश पवार

पूर्वी प्रत्येक घरामध्ये लाकडी देवघर असायची ति पण चांगले सागवान किंवा शिसव या लाकडापासून सुंदर नक्षीकाम केलेले देवघर पाहवयास मिळायचे, आता जंगले कमी झाली आणि पर्यावरणाचा र्‍हास टाळण्यासाठी जंगल तोडीस बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचे लाकूड उपलब्ध होत नसल्याने लाकडाची देवघर दुर्मिळ होऊ लागली आहेत.

लाकडाच्या देवघरास वाळवी लागू नये म्हणून पॉलिश लावावे लागते परंतु बदलत्या काळानुसार घरांच्या जागी अलिशान बंगले आहे .त्यामुळे घरांच्या बरोबरच देवघरनाच्या रुपात ही बदल झालेला दिसत आहे .आता काळानुसार बहुतांच्या घरांमध्ये लाकडा ऐवजी मार्बल अथवा ग्रेनाईट देवघर पहावयास मिळत आहेत .मार्बल देवघर हे मजबूत ,टिकाऊ ,आणि किड लागण्याचा धोका नसल्याने या देवघरांना पसंती ग्राहक करीत आहेत .

सदर मार्बलचे देवघर दुकाने शेवा-चारफाटा, बोकडविरा, सगीर पेट्रोल पंप जवळ दुकाने थाटण्यात आली आहेत. मार्बलचे देवघर आणि त्या वरील सुंदर नक्षीकाम पाहून लक्ष वेधले जाते .हल्लीच्या अद्यावत घरात अद्यवत सुखसोई मॉड्यूलर किचनमध्ये अधिक लक्ष दिले जाते. त्याचबरोबर देवघर हि प्रसन्न, मनशांत करणारे असावे या कडे लक्ष दिले जाते .पांढर्याशुभ्र मार्बल मुळे देवघर अधिकच सुंदर दिसत असून घरातील वातावरणही प्रसन्न राहते त्या मुळेच मार्बल देवघर खरेदी करतात असे खरेदी करणारे ग्राहक दिनेश घरत यांनी सांगितले.

मार्बलचे देवघर आम्ही राजस्थान उदयपुर, जयपूर, राजसमद आदी ठिकाणहून मार्बल चे देवघर आणतो. सुंदर नक्षीकाम करावयाचे असेल तर वाशी येथून करून आणतो. सध्या मार्बलच्या देवघरास मागणी वाढत आहे असे बोकडविरा येथील श्री कृष्ण मार्बल आर्ट चे मालक राकेश कुमार कश्यप यांनी सांगितले.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply