उरण : वार्ताहर
उरण येथील बौध्दजन पंचायत समिती उरण शाखा नं. 843 वतीने उरण बौध्द वाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. संस्कार विधी घेण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले.
या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक, कौशिक शाह, भाजप उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उद्योजक राजेंद्र, पडते, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, भाजप कार्यकर्ते हितेश शाह, उरण शाखा नं843 अध्यक्ष प्रकाश कांबळे, चिटणीस विजय पवार, चिटणीस रोशन गाढे, विनोद कांबळे, मारुती तांबे, बौध्द बौधाचार्य महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे, हर्षद कांबळे, आखिलेश जाधव, धनाजी ठाकुर, विजय भिंगावडे आदी उपस्थित होते.