Breaking News

दुर्गा पूजा कार्यक्रमाचा निधी कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी

नवी मुंबई बंगाली असोसिएशनचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

वाशी येथील ‘द नवी मुंबई बंगाली असोसिएशन’ (एनएमबीए) या संघटनेने 41 वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोरोनाकाळात आरोग्य, सुरक्षितता व कल्याण’ या संकल्पनेतून ‘नवी मुंबई बंगाली असोसिएशन’तर्फे दुर्गा पूजा साजरी करण्यात आली.

असोसिएशनचे अध्यक्ष नेमाई गोराई यांनी या वेळी माहिती देताना सांगितले की, जनसुरक्षा व जनकल्याण या क्षेत्रात कार्य केले जाते. या वर्षी हा कार्यक्रम सामाजिक नियमांचे पालन करीत साजरा केला जात आहे. ‘दुर्गोत्सव 2020’ हा कार्यक्रम  ‘द नवी मुंबई बंगाली असोसिएशन’ ची वेबसाईट, यूट्यूब आणि इतर समाज माध्यमांमधून सर्व नागरिकांसाठी डिजिटल स्वरुपात सादर करण्यात आली आहे. प्रसादासाठी वेबसाइटद्वारे नोंदणी करण्याची सोय भाविकांकरीता उपलब्ध करण्यात आली आहे.

कोलकता व मुंबई येथील गायकांचा ‘लाईव्ह कार्यक्रम’ या स्वतःच्या स्टुडिओमधून प्रक्षेपित करण्याचे ‘एनएमबीए’चे नियोजन केले असून हा कार्यक्रम नागरिकांना ऑनलाइन पाहता येईल येत आहे. तसेच या कार्यक्रमांमधून मिळालेला निधी एनएमबीए चालवीत असलेल्या एका केंद्रातील कर्करोग रुग्णांच्या उपचारांसाठी व पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply