Friday , September 29 2023
Breaking News

रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनचे सुयश

पनवेल : वार्ताहर

राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशन चषक स्पर्धा नुकतीच पुण्यातील बालेवाडी येथे घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले आहे.

या स्पर्धेत रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी स्पर्धेत दमदार कामगिरी करून आपली छाप पाडली. यात प्रद्युम्न म्हात्रे व प्रणय टोपले याने (पॉइंट फाईट व किक लाईट) प्रत्येकी दोन सुवर्णपदक, चेतन भगत (पॉइंट फाईट व लाईट कॉन्टॅक्ट) 1 सुवर्णपदक व 1 रौप्यपदक, रोहित भोसले (लो किक) सुवर्णपदक, अभिषेक राजपुरोहित (पॉइंट फाईट) 1 रौप्यपदक, आरव शेट्टी, नित्यम गुप्ता व अक्षय बापट (पॉइंट फाईट प्रत्येकी 1 कांस्यपदक आणि प्रफुल्ल मोटे याने (किक लाईट) 1 कांस्यपदक जिंकली. यशस्वी सर्व खेळाडूंचे अनंता धरणेकर, महेश पाटील, अमित जाधव व राजेश पाटील यांनी अभिनंदन केले. सर्व खेळाडूंना मंदार पनवेलकर,  रवींद्र म्हात्रे, प्रशांत गांगर्डे, निखील मते यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply