Breaking News

‘आशा वर्कर्सच्या समस्या तत्काळ सोडवा’

नवी मुंबई : बातमीदार

कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेल्या आशा वर्कर्स यांना जून महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. त्यांना देण्यात येणारा तुटपुंजा भत्ता देखील देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे गणवेशासाठी पैसे दिलेले नाहीत, काम करत असताना सुरक्षा साहित्य देण्यात आलेले नाही. एक प्रकारेेे आशा वर्कर्सची पिळवणूक होत असून याबाबत आपण तातडीनेे त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी भाजप माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन  लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

नवी मुंबईसह शिरवणे येथील आशा वर्कर्सच्या समस्येबाबत दिलेल्या निवेदनात जूनपासून पगार दिलेला नाही तो त्वरित द्यावा,  कोविड 300 रुपयेप्रमाणे भेटणारा थकित दररोजचा भत्ता द्यावा, मासिक सभा शुल्कची 150 रुपयांची वजाबकी मानधनातून करू नये, आशा सेविकांना गणवेश करीता पैसे द्यावे त्याचप्रमाणे मोबाईल रिचार्जचे पैसे अदा करावे, या महिलांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस मास्क, सॅनिटायझर हे स्व:खर्चाने खरेदी करावे लागत असून महापालिकेने ते सेविका म्हणून स्वतः घ्यावेत, केंद्र सरकारच्या नियमानुसार कोरोना सेविका म्हणून आशा वर्कर्सला देण्यात येणारे भत्ते व विविध योजना तात्काळ लागू कराव्यात, अशी मागणी माधुरी सुतार यांनी आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, आशा वर्कर्स यांच्या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आशा वर्कर्सच्या समस्या पालिकेकडून तत्परतेने सोडवण्यात येतील.

कोरोना काळात आशा वर्कर्स आपली कामे आपला जीव मुठीत घेवून करीत आहेत. त्यामुळे आशा वर्कर्सची चाललेली पिळवणूक व त्याच्यावरील अन्याय कदापि खपवून घेणार नाही. सर्वच पालिकेच्या यु.एच.पी.ची नियमानुसार सखोल चौकशी करावी. आशा वर्कर्सला महत्वपूर्ण सेवेबद्दल त्वरित न्याय द्यावा.

-माधुरी सुतार, माजी नगरसेविका, भाजप

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply