Breaking News

महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : बातमीदार

सानपाडा येथे साईभक्त महिला बचत गटाच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला. साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आमले, समाजसेविका शारदा आमले यांच्या प्रयत्नांतून हे कार्यालय उभारले गेले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी समाजसेवक पांडुरंग आमले व समाजसेविका शारदा आमले हे महिलांसाठी व सानापड्यातील नागरिकांसाठी राबवत असलेल्या विविदब उपक्रमांचे कौतुक केले. महिलांना रोजगार मिळणार असून उद्योग क्षेत्रात आपले पाऊल टाकता येणार आहे. या वेळी भाजप सानपाडा प्रभाग क्र. 76 व साई भक्त महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात पारितोषिक मिळवलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात 12 पैठणी व एक सोन्याची नथ व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

या वेळी भाजपचे प्रदेश आयटी सेल संयोजक सतीश निकम, जिल्हा उपाध्यक्षा नीता आंग्रे, युवा मोर्चा सचिव दीपिका बामणे, जिल्हा सचिव भारती मोरे, देवनाथ म्हात्रे, मंडल अध्यक्ष सानपाडा जुईनगर श्रीमंत जगताप, तालुका सचिव रमेश शेट्ये, पंकज दळवी, सुलोचना निंबाळकर, मंगल वाव्हळ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply