Breaking News

पाली वाघजाई परिसरात बिबट्याचा संचार, गुरख्यास दिले दर्शन

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील नागशेत, कुसुंबळे परिसरात काही दिवसांपुर्वी बिबट्या दिसला होता. त्यानंतर बुधवारी (दि. 18) सायंकाळी बिबट्या दिसल्याची माहिती पाली वाघजाई नगर येथील एका गुराख्याने वनविभागाला दिली. मात्र त्याने काढलेल्या पंजाचा फोटो सुस्पष्ट नाही. वन खात्यामार्फत याची सत्यता पडताळली जात आहे. गुराख्याने दिलेल्या माहितीनंतर वनविभाग सतर्क झाला असून, या विभागाचे कर्मचारी सकाळी पुन्हा स्पॉटवर जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती पाली-सुधागडचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी दिली. दरम्यान, पालीकरांच्या मनात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे. सुधागड तालुक्यात घनदाट जंगल आहे. जैवविविधतेसाठी पोषक वातावरण आहे. येथील जंगलात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार दिसून येतो. बिबट्या प्रवणक्षेत्रात नागरिकांनी जाणे टाळावे, नागरिकांनी स्वतःची, कुटुंबाची व गुरांची काळजी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी केले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply