मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन
म्हसळा : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कारणाने मराठा समाज आपली नोंद ओबीसी मध्ये करावी, अशी सध्या मागणी करत आहे. त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे म्हसळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ठाम मत असून समितीच्या वतीने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच मंगळवारी (दि. 3 नोव्हेंबर) म्हसळा तालुक्यातून सर्व गाव वाडी वस्ती वरून सुमारे दोनशे प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिनिधी आणून तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देणार आहेत असे तहसीलदार म्हसळा यांना निवेदन देऊन कळविले आहे.
या वेळी स्थानिक ओबीसी संघर्ष समन्वय समितेचे संतोष पाटील, महादेव भिकू पाटील, बबन उंडरे, माजी सभापती महादेव चांगू पाटील, लक्ष्मण भाये, गजानन पाखड, राजेंद्र बोरकर,सतीश शिगवण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चाचे माध्यमाने ओबीसी संघर्ष समन्वय समिती मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, महाराष्ट्रातील सरळ सेवा भरती तात्काळ सुरू करावी, जन गणना जात निहाय करावी, आठ जिल्ह्यातील कमी केले आदिवासींचे आरक्षण पूर्ववत करावे, महाज्योती या प्रशिक्षण संस्थेसाठी रुपये पाचशे कोटी निधी तरी द्यावा थकित शिष्यवृत्ती व ओबीसींचे वस्तीगृह यावर्षी पासून सुरु करावी या मागण्या आम्ही लावून धरणार असल्याचे तालुक्याचे कुणबी समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.