Breaking News

पेणमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान

पेण : प्रतिनिधी – माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण शहरातील प्रत्येक प्रभागात भाजप सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी अभियान सुरू आहे. शहरातील कुंभारआळीमध्ये भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर व नेते विनोद शहा यांच्या उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

माजी सभापती मयुर कुंभार, शहर चिटणीस कैलास जाधव, तसेच प्रभाग 1मधील भाजप कार्यकर्ते हितेश पाटील, नाईक, संजय अभंग, गोरिवले, चव्हाण, फड सर, काका भोईर, दत्तात्रेय चांदोरकर, हेमंत गुरव, प्रसाद पाटील, रोहन म्हात्रे, भाई म्हात्रे, भाऊ चव्हाण आदी कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply