पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात नव्या 125 कोरोना रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (दि. 29) झाली, तर दिवसभरात 228 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 77 व ग्रामीण 22) तालुक्यातील 99, खालापूर आठ, पेण पाच, अलिबाग चार, कर्जत, रोहा, महाड प्रत्येकी दोन, तर तळा, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यामधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मयत रुग्ण पनवेल (मनपा दोन, ग्रामीण एक) तालुक्यात तीन, कर्जत दोन, तर पेण आणि रोहा तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत.