Breaking News

भाजपतर्फे पनवेल, उरण मतदारसंघांमध्ये विकासकामांचा धूमधडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षातर्फे अविरतपणे विकास सुरू असून, पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला आला. ही सर्व कामे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत केली जात आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघातील कोंडले ते खैरवाडी, धामणी ते ठाकूरवाडी, धामणी ते हौशाची वाडी, तर उरण विधानसभा मतदारसंघातील गिरवले, चिरवत सांगुर्ली, कल्हे, डोलघर, पोसरी ठाकूरवाडी, पोयंजे ते पाली बुद्रुक कातकरवाडी येथे रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय वावेघर येथे भाजपनेते महेश बालदी यांच्या स्वखर्चातून जलवाहिनी आणि ग्रामपंचायत निधीमार्फत पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहे. जलवाहिनीसाठी बालदी यांनी एक लाख 30 हजार रुपये दिले आहेत.

या विविध ठिकाणच्या भूमिपूजन समारंभांना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, संजय टेंबे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, सांगुर्लीचे सरपंच दत्तात्रेय हातमोडे, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, कर्नाळा ग्रामपंचायतीचे सदस्य विद्याधर जोशी, कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल पाटील, सदस्य महेंद्र गोजे, खैरवाडीच्या सरपंच संगीता शिंदे, वावेघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास माळी, सदस्य जगन्नाथ चव्हाण, अशोक गायकर, सदस्या मनीषा राठोड, माजी सरपंच रामा माळी, महादेव कांबळे, साहेबाज कसाई, निलेश बोटे, सोनीबाई जाधव, गौरी राठोड, प्रीती चव्हाण केळवणे, जि. प. अध्यक्ष किरण माळी, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष सुनील माळी, वावंजे विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, आत्माराम हातमोडे, ज्ञानेश्वर सुर्वे, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश गाताडे, संतोष माळी, बुधाजी खैरे, अनंता खैर, रामदास फडके आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply