वनवासी कल्याण आश्रम व प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम; रविवारी हस्तांतरण समारंभ
म्हसळा : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरांचे पुनर्वसन वनवासी कल्याण आश्रम आणि प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या वास्तूंचा हस्तांतरण समारंभ रविवारी (दि. 1) होणार आहे.
रायगड जिल्ह्याला 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्यात जिल्ह्यातील वाड्यावस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते आदिवासी वाडीतील 16 घरे या वादळात उध्वस्त झाली होती. वनवासी कल्याण आश्रम आणि प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्ट (अंधेरी) यांच्या संयुक्त विद्यमाने या 16 घरांचे पुनर्वसन कार्य पूर्ण करण्यात आले असून, त्या वास्तूंचा हस्तांतरण समारंभ रविवारी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या अध्यक्षा ताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या कार्यक्रमाला अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे सोमया जुलूज, प्रतिबिंब चॅरिटेबल ट्रस्टचे नरेश पडिया आणि परमपूज्य वाघुले महाराज (नारंगी-रायगड) यांच्यासह प्रवीण मानकर, महेश देशपांडे, श्रीधर कोचरेकर, मुकुंद चितळे, भिवा पवार, पी. ललिता आदि मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.