Breaking News

शास्ती माफी लवकरात लवकर लागू करा; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा द्या- खासदार श्रीरंग बारणे

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या टॅक्ससंदर्भात नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. के.एच. गोविंदराज यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत शास्ती माफीच्या संदर्भात चर्चा झाली असता शास्ती माफी लवकरात लवकर लागू करावी, जास्तीत जास्त शास्ती माफी देण्यात यावी आणि त्याचबरोबर पूर्वीच्या काळात ज्या मालमत्ताधारकांनी शास्ती भरली आहे त्यांनाही पुढे भरायच्या करामधून आधी भरलेल्या शास्तीची रक्कम वगळण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नागरिकांनी भरलेली शास्ती पुढील टॅक्स भरणातून वगळण्यात आल्याची प्रकरणे असल्याबाबत माहिती दिली व त्याचा अभ्यास करून याबाबत पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा द्यावा, अशा पद्धतीची मागणी केली. या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीसुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply