उरण : वार्ताहर – ओएनजीसी पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियनकडून गुरुवारी (दि. 29) वर्गणी काढून उरण येथील कोविड केअर सेंटरला चाळीस वाफारा मशीन, सहा ऑक्सिमिटर, 100 शुगर टेस्टिंग किट, फेस शिल्ड, एन 95 मास्क, ग्लोव्हज, इत्यादी गोष्टींचे वाटप केले.
या कार्यामध्ये सेक्रेटरी(पीइयू)अरविंद घरत, माजी सेक्रेटरी (पीइयू) दिनेश घरत, लायसन ऑफिसर (ओबीसी) प्रवीण बी. घरत, वाइस प्रेसिडेंट (पी इ यू) इकबाल डी. शेख, वैभव लवेकर वर्किंग प्रेसिडेंट ऑल इंडिया ओबीसी इडब्ल्यूए, जॉईंट सेक्रेटरी (पीइयू) घनश्याम घरत, खजिनदार (पीइयू) गोविंद पाटील यांनी वर्गणी काढून उरण येथील कोविड केअर सेंटरला साहित्याचे वाटप केले. त्यामुळे तेथील असलेल्या रुग्णांना फार दिलासा मिळाला आहे.
हे साहित्य त्यांनी नोडल ऑफिसर डॉ. स्वाती म्हात्रे आणि संतोष पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमास कॉप्रोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सिस्टर कामिनी आणि सारिका ह्या देखील उपस्थित होत्या. अशी भरीव मदत त्यांनी जून महिन्यात देखील केली होती आणि त्यामुळेच सर्व रुग्णांना त्याचा खुप फायदा झाला होता. प्रा राजेंद्र मढवी यांनी सर्वांचे आभार मानले.