मुंबई : राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार आहे तसेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत आधी विचार होईल, असेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. राज्य शासनाने कालच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची हजेरी 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयानंतर दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचे संकेत शिक्षणमंत्र्यांकडून मिळाले आहेत.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …