Breaking News

रायगडात 152 नवे कोरोना रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात नव्या 152 कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 30) झाली, तर दिवसभरात 151 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 99 व ग्रामीण 28) तालुक्यातील 127, पेण आठ, खालापूर सहा, अलिबाग चार, उरण तीन, माणगाव दोन आणि कर्जत व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत झालेले रुग्ण पनवेल तालुक्यात चार आणि रोहे तालुक्यात दोन असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 53,864 आणि मृतांची संख्या 1550 झाली आहे. 50,951 जण कोरोनामुक्त झाल्याने 1363 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply