Breaking News

पनवेल तालुक्यात विकासपर्व

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासाचा नवा झंझावात सुरू झाला आहे. शासकीय योजनेंतर्गत, तसेच आस्थापनांच्या माध्यमातून विविध कामांची भूमिपूजने करण्यात येत असून, यामुळे तालुक्यातील जनतेला विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

धानसर येथे विकासकामांचा शुभारंभ

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेजच्या विकासकामांचे ई-भूमिपूजन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) करण्यात आले होते. यातील धानसर गावात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला.

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, प्रभाग क्रमांक 1 मधील धानसर गावाला मनपाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या कामाच्या शुभारंभास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक संतोष भोईर, तसेच नंदकुमार म्हात्रे, चाहूशेठ पाटील, विनेश कदम, संतोष पाटील, रमेश मढवी, निहाल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धानसरमध्ये पायाभूत सुविधांसाठी नऊ कोटी 53 लाख 56 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

चिखले येथे रस्त्याचे भूमिपूजन

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पनवेल तालुक्यातील चिखले फाटा ते चिखले गावापर्यंतच्या रस्त्याचे काम केले जाणार असून, त्याचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 12) करण्यात आले.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे चिखले येथील रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर झाला आहे. त्याच्या भूमिपूजन समारंभास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, कोन ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश म्हात्रे, भाजप नेते एकनाथ भोपी, ज्ञानेश्वर बडे, चिखलेचे सरपंच नामदेव पाटील, उपसरपंच रवींद्र गडकरी, राजश्री भोपी, मच्छींद्र पाटील, सचिन पाटील, हिरामण पाटील, राम फडके, विनोद पाटील, रमेश गडकरी, तुळशीराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष गाताडे, अतुल पाटणकर, जयंत पाटणकर, बंडूशेठ पाटणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोयनावेळे, रोडपालीतही मिळणार सोयीसुविधा

पनवेल महापालिका हद्दीतील रोडपाली आणि कोयनावेळे येथील विकासकामांचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या समारंभांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग समिती ब, प्रभाग क्रमांक 7मध्ये रोडपाली आणि प्रभाग समिती अ, प्रभाग क्र. 1 मध्ये कोयनावेळे ही दोन स्मार्ट व्हिलेज करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे रोडपाली बौद्धवाड्यातही विकासकामे केली जाणार आहेत. त्यासाठी अनुक्रमे नऊ कोटी 20 लाख 32 हजार 924, 13 कोटी 45 लाख 12 हजार 304 आणि तीन कोटी तीन लाख 73 हजार 436 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दोन कोटी 40 लाख 97 हजार 247 रुपये खर्चून खारघर येथे आयुक्तांसाठी निवासस्थान बांधण्यात येणार आहे. या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात आला. या समारंभांना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply