
पनवेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासई ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, धर्माशेठ पाटील, यशवंत घरत, बाबूराव मढवी आदी उपस्थित होते.