Breaking News

रायगडात 93 नवे कोरोना रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत असून, सोमवारी (दि. 2) नव्या 93 रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 143 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 48 व ग्रामीण 24) तालुक्यातील 72, अलिबाग सात, पेण चार, कर्जत, माणगाव व महाड प्रत्येकी दोन, उरण आणि मुरूड, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत झालेले रुग्ण पेण तालुक्यात दोन व पनवेल तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 54,217 आणि मृतांची संख्या 1557 झाली आहे. आतापर्यंत 51,382 जण कोरोनामुक्त झाल्याने 1278 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply