कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
रिलायन्स फाउंडेशन आणि पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील शिलार गावात जनावरांसाठी तपासणी व लसीकरण शिबीर घेण्यात आले. या वेळी उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शनही करण्यात आले.
पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद साळोखे यांनी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात जनावरांना लाळ्या, खरतुक रोगाचे लसीकरण करून टॅगिंग करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. किसन देशमुख, यांनी पशुपालकांना लाळ्या खरतुक लसीकरणा संबंधी मार्गदर्शन केले. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने 17 पशुपालकांना मिनिरल मिक्स्चर वाटप करण्यात आले. तसेच मिनिरल मिक्स्चर पावडर ही व आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे पशुपालकांना समजावून सांगण्यात आले. शिबिरास संस्थेचे प्रकल्प अधिकारी तेजस डोंगरीकर, शैलेश भोईर तसेच पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.