Breaking News

तक्का परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा -नगरसेवक अजय बहिरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त  

पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गाव परिसरातील विजेच्या समस्यांचे निवारण करून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नगरसेवक अजय बहिरा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा सोबत होते. नगरसेवक अजय बहिरा यांनी निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गाव परिसरात वीज खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पनवेल शहरातील विद्युत अभियंत्यांच्या निदर्शनास अनेकदा ही बाब आणून उपाययोजना करण्यास सांगूनही कार्यवाही झाली नाही. तक्का गावातील उत्तरेकडे उर्दू शाळेच्या रोडवर काही वर्षांपूर्वी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. त्यावरून  काही भागांना वीजपुरवठा करण्यात येत होता, परंतु तो ट्रान्सफार्मर हलवून दुसरीकडे त्याचा वापर करण्यात आला आहे. या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसविल्यास तक्का गाव व परिसरातील वीज समस्यांचे निराकरण होईल. याचा योग्य विचार करून तक्का तसेच आजूबाजूच्या परिसरात अखंडित व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विद्युत महामंडळाकडून उपाययोजना करण्यात याव्यात.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply