Breaking News

पोलादपूर नगरपंचायतीच्या 58 उमेदवारी अर्जांपैकी 43 अर्ज वैध

पोलादपूर : प्रतिनिधी

नगरपंचायत पोलादपूरच्या 17 प्रभागांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58 उमेदवारी अर्ज दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलादपूर नगरपंचायतीच्या 4 नामाप्र प्रभागांमध्ये या वेळी निवडणूक होणार नसल्याने 14 उमेदवार आपोआपच रिंगणाबाहेर गेले आहेत. उर्वरित 14 प्रभागांतील 15 अर्ज अवैध झाल्याने 43 उमेदवारी अर्ज रिंगणात राहिल्याचे चित्र छाननी आक्षेपानंतर दिसून येत आहेत.

भाजपतर्फे प्रसन्ना पालांडे यांनी प्रभाग 13 मधून, शीला बुटाला प्रभाग 4 मधून, रश्मी दीक्षित प्रभाग 6 मधून, अंकिता जांभळेकर यांनी प्रभाग 14 मधून, एकनाथ कासुर्डे यांनी प्रभाग 15 मधून, तर विशाखा आंबेतकर यांनी प्रभाग 3 मधून, हर्षदा बोरकर प्रभाग 7 मधून, मंजू मोरे प्रभाग 9 मधून, तर प्रभाग 16 मधून नितीन बोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

बुधवारी झालेल्या छाननीमध्ये काँग्रेसचे शर्मिला दुदुस्कर, प्रियांका नांदगावकर, शुभांगी भुवड, सारिका विचारे, समीरा महाडिक, मदार शेख आणि शुभांगी भुवड, तर शिवसेनेचे स्वाती दरेकर, कल्पना सवादकर, निलीमा सुतार, रिया मोरे, प्रशांत आंब्राळे, प्रकाश गायकवाड आणि मनसेचे संदेश सुतार आणि अभासेनेच्या कोमल महेंद्र जाधव आदी 15 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

पोलादपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका सर्वच प्रभागांत निर्णायक ठरणार असून शिवसेनेला याचा फटका बसेल की काँग्रेसला याबाबत येणार्‍या मतदानाचा कौलच ठरविणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाने नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षित प्रभागांतील निवडणुका स्थगित केल्याने प्रभाग 2 मध्ये कल्पेश मोहिते, मनोज प्रजापती, सुरेश पवार, लहू पवार आणि संभाजी माने, तसेच प्रभाग 8 मध्ये रिमा बुरूणकर आणि अनिता जांभळेकर, प्रभाग 10 मध्ये शुभांगी चव्हाण, संगीता इंगवले, प्रज्ञा सुर्वे, सायली सलागरे, प्रभाग 14 मध्ये निलेश सुतार, अंकिता जांभळेकर आणि प्रकाश भुतकर आदी 14 नामाप्र उमेदवारांचे अर्ज वैध ठरूनही ते सर्व रिंगणाबाहेर आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply