प्रकाश अण्णा शेंडगे यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आगरी दर्पण मासिक आज 25 वर्षांची वाटचाल पुर्ण करीत आहे.ते आता आगरी समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण ओबीसी समाजाचे व्यासपीठ व्हावे व त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, म्हणजे आगरी समाजाबरोबरच ओबीसींही संघटीत होऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढेल, असा विश्वास ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी येथे व्यक्त केला.
अखिल आगरी समाज परिषदेचे मुखपत्र असलेल्या आगरी दर्पण दिवाळी अंकांचा प्रकाशन समारंभ शुक्रवारी (दि. 13) मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, उपाध्यक्ष मधुशेठ भोईर, संपादक दीपक म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, उप व्यवस्थापक श्याम मोकल हे उपस्थित होते. उपस्थित सुकृत खांडेकर, नरेंद्र वाबळे, दशरथ पाटील, चंद्रकांत बावकर, जे. डी. तांडेल यांनी आपल्या मनोगतामध्ये मासिकाला शुभेच्छा दिल्या.