Breaking News

लक्ष्मीपूजन दिवशी अनेक गावागावांमध्ये कबड्डी मैदानाचे शुभारंभ

धाटाव : प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील कबड्डी स्पर्धा अनेक महिने कोरोनामुळे वाया गेली व अद्याप कुठेही सामने न झाल्याने कबड्डी पट्टू बैचेन झाले आहेत. त्याचबरोबरीने रायगडची निवड चाचणी अद्याप घेण्यात आली नाही नसल्याने सरावासाठी असंख्ख गावातील खेळाडूने आपल्या लक्ष्मीचे  म्हणजे कबड्डी मैदानाचे दिपावलीच्या लक्ष्मीपूजन दिवशी शुभ दिवशी तालुक्यातील अनेक ठिकाणी शुभारंभ करण्यात आले.

लाल मातीतील मराठी माणसाचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कबड्डी खेळ आहेच पण कबड्डी ही रायगडची पढंरी म्हणून संबोधतली जाते. पण या वर्षी कोरोनामुळे अद्याप राज्य शासनाच्या व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन वतीने खेळासाठी परवागी नसल्याने कबड्डी खेळाडू खेळण्यासाठी बैचेन झाले आहेत. पण खेळाची आवड असली तरीही नियम व अटी पुढे काही चालत नाही हेच खरे.  अनेक खेळाडू आपल्या बहारदार जोरावर निवड चाचणीमध्ये अप्रतिम पक्कडी व चढाईचा नमुना पेश करीत, माडींवर थाप देत आप आपली सिद्धता दाखवून आपण निवडीसाठी योग्य आहोत हे दाखवून दिले जाते.

अशा अनेक अपेक्षाचे ओझ ठेवून या वर्षी सुद्धा चांगले खेळाचे प्रदर्शन करण्याच्या हेतूने बोरघर, आंबेवाडी, गावठान, महादेववाडी, तळाघरसह अनेक ठिकठिकाणी सरावासाठी मैदानाचे शुभारंभ करण्यात आले. आता मात्र जिल्हा व तालुका कबड्डी असोशियन सामने भरवण्यासाठी परवानगीची डोळे लावुन कबड्डी खेळाडू तसेच चित्तथरारक सामने सुरू होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply