Breaking News

बिहारनंतर भाजपचे ‘मिशन बंगाल’

पाच प्रभारींची नियुक्ती; तावडेंचाही समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिहारमधील विधानसभा विजयानंतर भाजपने आता पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील विधानसभा निवडणूक 2021च्या एप्रिल-मे महिन्यात होत आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेसला टक्कर देण्यासाठी भाजपने प. बंगालच्या पाच भागांत केंद्रीय नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सुनील देवधर, विनोद तावडे, दुष्यंत गौतम, हरिश द्विवेदी आणि विनोद सोनकर यांचा समावेश आहे.
कोलकातामध्ये झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय संघटन महासचिव बी. एल. संतोष आणि महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी या निर्णायाची घोषणा केली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही उपस्थित होते. बैठकीनंतर घोष यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नियुक्त केलेले पाच नेते त्यांच्या क्षेत्रात पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता काबीज करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी प्रभारी नियुक्तीनंतर आता ते पुढील महिन्यात या राज्याचा दौराही करण्याची शक्यता आहे. 

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply